Mahila Samriddhi Yojana : महिला समृद्धी योजने अंतर्गत केंद्र सरकार महिलांना उद्योग उभारणी करिता एक लाख 40 हजार पर्यंतचे कर्ज देते. आर्थिक दृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजने अंतर्गत महिला आत्मनिर्भर बनवू शकते. देशातील मागासवर्गीय आणि गरीब महिला उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय आणि विकास मंडळाद्वारे महिला समृद्धी योजना राबवली जाते.
महिला समृद्धी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात
या योजनेचा लाभ घेऊन भारतातील गरीब आणि मागासवर्गीय महिला आपला व्यवसाय सुरू करू शकतात. महिला समृद्धी योजना अंतर्गत पात्र महिलांना एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते. 18 ते 55 वय वर्षातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Mahila Samriddhi Yojana विषयी सविस्तर माहिती
- योजनेचे पूर्ण नाव महिला समृद्धी योजना आहे.
- योजना केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येत आहे.
- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.
- या योजनेद्वारे गरीब महिलांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिला जातो.
- या योजनेचा फायदा मागासवर्गीय आणि गरीब कुटुंबातील महिला उद्योजकांसाठी होतो.
- या योजनेला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- अधिकृत वेबसाईट – https://nsfdc.nic.in/en/mahila-samriddhi-yojana
Mahila Samriddhi Yojana या योजनेला अर्ज कसा करावा
- महिला समृद्धी योजनेला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- महिला समृद्धी योजनेला अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 18 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे लागते.
- महिला समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी नसावे.
- महिला समृद्धी योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या केंद्र सरकारच्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा.
- त्यानंतर त्या अर्जामध्ये आपली आवश्यक माहिती भरावी.
- अर्जामध्ये नमूद केलेले आवश्यक सर्व ड
- डॉक्युमेंट्स अर्जासोबत जोडावेत.
- हा अर्ज संबंधित जिल्हा कार्यालयात जाऊन जमा करावा.
1 thought on “महिला समृद्धी योजनेत मिळणार 1 लाख 40 हजार! Mahila Samriddhi Yojana”